कोलकाता, बदलापूर घटनेच्या निषेधार्थ दोंडाईचात मोर्चा काढत फाशीची शिक्षा देण्याची मागणी.

0

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख

कोलकाता येथे महिला डॉक्टरची बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हळहळत आहे. ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही शाळेत शिकणाऱ्या चिमुरडींवर शाळेच्या कर्मचान्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याने महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली आहे, असे असूनही पोलीस दल, गृहविभाग, शासनाकडून असंवेदनशीलता दाखविली जात आहे. त्यामुळे ‘आम्हाला लाडक्या बहिण योजनेचे पैसे नको, आम्हाला संरक्षण द्या’ असे म्हणत एका लाडक्या बहिणीने योजनेचे पैसे थेट दोंडाईचा तहसीलदारांना परत केले आहे. दोंडाईचात शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने तरूणी, महिलांनी सहभागी होत अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. शहरातील आझाद चौकातून सकाळी १० वाजता मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा भलवाल टॉकीज, बाजार पेठ, गुरू स्टॉप, डीआर हायस्कूल, छ. शिवाजी महाराज स्मारकमार्गे दोंडाईचा अपरतहसील कार्यालयावर धडकला, यावेळी तहसीलदार संभाजी पाटील यांच्यावतीने प्रवीण ससाणे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी एक लाडकी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे १५०० रूपये देखील परत केले.
तसेच आम्हाला योजनेचे पैसे नको, पण आम्हाला संरक्षण द्यावी अशी सरलाबाई या लाडकी बहिणी केली. अत्याचार करणाऱ्या नराधमांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीवर लटकविण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली, यावेळी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, शहर प्रमुख शैलेश सोनार, शह समन्वयक राकाशेठ रूपचंदनी, किशोर पाटील, राहूल माणिक,अक्षय धनगर, बापू परदेशी, विक्रम नाईक, कल्लू पठाण, जमील खाटीक, सादीक पिंजारी, किरण साळवे, संजय मगरे, महेंद्र धनगर, आबा चित्ते, नरू काकडे, भारत जाधव, सचिन नगराळे, कैलास ठाकरे यांच्यात्तह महिला भगिनी, तरूणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!