साहित्य संमेलनासाठी लोगोचे आवाहन…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे २ फेब्रुवारी २०२४ पासून होणाऱ्या १७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी खान्देशी संस्कृती संकल्पनेवर बोधचिन्ह तयार करण्याचे आवाहन मराठी वाङ्गय मंडळातर्फे करण्यात आले आहे.
खान्देशातील कला, साहित्य व संस्कृती सामाजिकता इत्यादींचे वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब उमटणारे बोधचिन्ह २० जुलैपर्यंत अमळनेर मंडळाच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन शरद सोनवणे, नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रम्हे यांनी केले आहे.