सचिन पाटलांची अनिल पाटलांविरूध्द घोषणाबाजी

अमळनेर (प्रतिनिधि)
राजकीय भूकंपा नंतर राष्ट्रवादीत फूट झाल्याचे दिसून आले बाजार समिती निवडणुकीत नाराज झालेले तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आठ ते दहा कार्यकत्यांसह मी शरद पवारांसोबत असे लिहिलेल्या टोप्या घालून महाराणा प्रताप चौकात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी शिदे गटाच्या विरोधातही घोषणाबाजी केली. गद्दार आणि अमळनेर भूमिपुत्राचा निषेध, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. त्यांच्यासोबत हर्षल पाटील, सचिन वाघ, हर्षल पाटील, संदेश पाटील आदी कार्यकर्ते हजर होते.