शरद पवार ९ व १० जुलैला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर.. -कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.

अमळनेर (प्रतिनिधि) राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भूमिपुत्र आमदार अनिल पाटील हे अजित पवारांच्या गटात जाऊन मंत्री झाल्याने शरद पवारांनी अमळनेर तालुक्याचा आढावा व परिस्थिती जाणून घेतली ९ व १० रोजी या दोन दिवसांमध्ये शरद पवार हे नाशिक, मालेगाव, धुळे त्यानंतर नरडाणा, अमळनेर, पारोळा, धरणगाव, जळगाव ग्रामीण आणि मुक्ताईनगर येथे येणार आहे. मुक्ताईनगरला मोठी सभा घेऊन कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहे. दौऱ्याच्या मार्गावर पवार हे आपल्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.