शरद पवार यांनी आटोपता घेतलेला दौरा पुन्हा सुरू करणार ?

24 प्राईम न्यूज 17 jul 2023
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत घडामोडी पाहता अध्यक्ष शरद पवार हे येत्या एक ऑगस्टपासून राज्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीला सावरण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जाहीरसभा घेतल्यानंतर पावसाचे कारण देत त्यांनी आटोपता घेतलेला दौरा ते पुन्हा सुरू करणार का, याकडे राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे.
सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती अजित पवार यांच्या गटाने केल्यानंतर याविषयी शरद पवार यांनी काहीच भाष्य केलेले नाही. यशवंतराव चव्हाण केंद्रातील पक्षांतर्गत घडामोडीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयास भेट दिली. याठिकाणी त्यांनी नाशिक भागातून आलेल्या युवकांशी संवाद साधला.