एरंडोल येथे पांडववाडा हनुमान मंदिरात शनिवारी महाआरती..
भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; युवक, महिलांची लक्षणीय उपस्थिती..

प्रतिनिधि( एरंडोल )
एरंडोल येथील पांडववाड्यासमोर असलेल्या पांडववाडा हनुमान मंदिरात शनिवारी (ता. २२) सायंकाळी आठचआ सुमारास हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी महिलांसह युवक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. या वेळी भाविकांनी ‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘बजरंगबली की जय’ सह ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.
पांडववाडा परिसरात तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जमावबंदी आदेश लागू केला होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने या परिसरात लागू केलेला जमावबंदी आदेश रद्द केल्यामुळे पांडववाडा संघर्ष समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत हिंदुत्ववादी संघटना व पांडववाडा संघर्ष समितीतर्फे हनुमानमंदिरात दररोज मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आरती केली जात होती. शनिवारी मात्र सायंकाळी आठ वासता सुमारास आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीचा संदेश व्हॉट्स अॅपसह सोशल मिडियावरुन व्हायरल झाल्याने सायंकाळी सातपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ लागली. शहरातील सर्वच समाजातील नागरिक, महिला, व्यापारी, युवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीयांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. या महाआरतीमुळे पांडववाडा परिसर भाविकांच्या गर्दीने भरला होता. विठ्ठल मंदिर ते परदेशी गल्लीपर्यंत भाविक शिस्तीने महाआरती कार्यक्रमात सहभागी झाली होते. यावेळी पांडववाडा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रसाद दंडवते, सचिव अमोल जाधव, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, सुरेश खुरे, डॉ. नरेंद्र पाटील, सतीश परदेशी, प्रकाश पाटील , शिवसेनेच्याठाकरे गटाचे, गुड्डू ठाकुर,विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, प्रकाश महाजन, भोला पवार, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, अॅड. अजिंक्य काळे, अॅड. आकाश महाजन, अॅड. दीपेश पांडे, अॅड. चंद्रकांत पारखे, अॅड. आकाश महाजन, भिका वाणी, सतीश पल्लीवाल, रवींद्र निंबाळकर, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, रश्मि दंडवते , शोमा साळी, क्षमा साळी, नीलिमा मानुधने, रत्ना सोनार यांच्यासह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, मंगलसिंग पाटील, हवालदार अनिल पाटील, सुनील लोहार, प्रशांत पाटील, जुबेर खाटीक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.