मैत्री सेवा फाउंडेशन एरंडोल आयोजित निसर्ग सप्ताह
२३ जुलै ते २८ जुलै..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल शहरातील सर्व नागरीकांना, शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपण देखील निसर्ग सप्ताह मध्ये आपल्या शेतात,बांधावर,मोकळ्या परिसरात, रस्त्यालगत किंवा इ.ठिकाणी वृक्ष लावून सहभागी होऊ शकता.
२३ जुलै ते २८ जुलै दरम्यान निसर्ग सप्ताह राबवण्यात येणार आहे आपल्या आवश्यक असलेली रोपे बुक करा. आणि या निसर्ग सप्ताह मध्ये सहभागी व्हा. एकूण (२०) रोपे घेऊन त्यांच्या सांगोपणाची जबाबदारी घेणाऱ्यास सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
आणि एकूण (५०)रोपे घेऊन त्यांच्या सांगोपणाची जबाबदारी घेणाऱ्यास सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल
निसर्ग सप्ताह उपलब्ध रोपे
नीम,बांबू,सीताफळ,गुलमोहर, जांभूळ,करंज,देव कपाशी,आवळा,चिंच,शिसु ,मोहा,
इत्यादी प्रकारची रोपे मिळतील.
त्यांचा दर शासन निर्धारीत आहे तो पुढील प्रमाणे असेल.
◆९महिन्याचे (लहान पिशवीतील रोप):- १२/-
आपण खालील ठिकाणी भेट देऊन आपल्याला हवे असलेली रोपे बुक करू शकता किंवा खालील क्रमांकावर संपर्क करू शकता
१)M S CONSTRUCTION
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , एरंडोल
7038793444 २)श्री स्टेशनरी जनरल स्टोअर्स माळीवाडा कॉर्नर एरंडोल 7588053195
३) अंबिका मेडिकल जयहिंद चौक गांधीपुरा एरंडोल 9096239684
बुकिंगची मुदत पूर्ण झाल्यानंतर ३० जुलै रोजी सर्व रोपांचे स्टॉल लावून वाटप करण्यात येईल.
ठिकाण :- उड्डाणपुलाखाली धरणगावचौफुली एरंडोल.