विश्वचषक क्रिकेटमध्ये बेटिंग; खान्देशातील पाचजण कोठडीत..

अमळनेर/ प्रतिनिधि क्रिकेटमध्ये सट्टा बेटिंग व कुबेर नावाचा मटका चालवणाऱ्या खान्देशातील पाच जणांसह 14 जणांना ओरिसा पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळून कुबेर मूर्ती, रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
ओरिसामधील बोलंगिर येथे

एका हॉटेलमध्ये वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया सामन्यावर ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सुरु आहे, अशी माहिती तेथील पोलीस अधीक्षक ऋषिकेश याना मिळाली होती. त्यांनी डीवायएसपी तुफान बाग, पोलीस अधिकारी अभिजित याना पाठवून कारवाई केली असता त्याठिकाणी कुबेर नावाचा सट्टा जुगार देखील सुरु असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी 14 जणांना अटक करून त्यांच्या जवळील कुबेराच्या 9 चांदीच्या मूर्ती, 20 हजार रुपये रोख, काही मोबाईल, चारचाकी क्रमांक एमएच 19 सीएफ 8287 ताब्यात घेतली. अटक केलेल्या आरोपींमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महेंद्र महाजन, प्रवीण महाजन, फिरोज खान, पारोळा येथील अर्जुन महाजन, धुळे येथील संत तुकाराम नगर येथील राहुल हिरालाल माळी यांच्यासह बोलनगीर येथील व इतर अशा एकूण 14 जणांचा समावेश आहे.