भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर : रावेरात रक्षा खडसे तर जळगावात स्मिता वाघ यांना संधी. – खा. उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं

0

24 प्राईम न्यूज 14 Mar 2024. लोकसभेच्या भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर म करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून रक्षा खडसे यांना जैसे थे ठेऊन स्मिता वाघयांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे हिना गावित या सध्या तिथल्या खासदार आहेत. त्या गेल्या १० वर्षांपासून नंदुरबारच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळीविजयाची हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली आहे धुळे मतगारसंघातून सुभाष – भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यांचं – तिकीट कापलं जाईल, अशीचर्चा सुरु होती पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी दिली आहे. जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे जळगावात भाजपने विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघयांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता बाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. स्मिता बाघ यांच्याकडे जळगावात आदराने पाहिलं जातं. त्यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच मानला जातो. असं असलं तरी आगामी काळात काय निकाल येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या उमदेवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल, अशी चर्चा होती. पण त्यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!