कडिपत्ता: आरोग्यासाठी फायदे आणि उपयोग..

0

आबिद शेख/अमळनेर.. राजकारणात असे अनेक वेळा घडते की काही नेते लोकांना त्यांच्या गरजेपुरते वापरतात आणि गरज संपल्यानंतर त्यांना बाजूला सारून टाकतात. अशा वेळी ज्याचा उपयोग करून घेतलेला असतो, तो व्यक्ती नाराज होतो आणि म्हणतो की, “नेत्याने मला कडीपत्त्यासारखे वापरले.”

आपल्याला प्रश्न पडतो की कडीपत्ता राजकारणात आला कुठून? पण जर नीट विचार केला, तर आपणच आपल्या जेवणात कडीपत्त्याचा कसा उपयोग करतो, हे समजून घेतल्यास उत्तर सापडेल. जेव्हा आपण भाजी, आमटी किंवा कढी बनवतो, तेव्हा कडीपत्ता त्यात सुगंध आणि चव आणण्यासाठी टाकतो. पण ताटात भाजी आली की आपण कडीपत्ता काढून टाकतो, कारण त्याचे काम पूर्ण झालेले असते.

खरं तर कडीपत्ता खूप उपयोगी आणि गुणकारी असतो. तो पचन सुधारतो, अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. मात्र, त्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करून तो बाजूला फेकला जातो.

याचप्रमाणे, राजकारणातही अनेकदा लोकांचा उपयोग करून त्यांना नंतर विसरले जाते.कडीपत्त्याचे औषधी गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत, पण आपण तो बहुतेक वेळा फक्त चव आणि सुगंधासाठीच वापरतो आणि खाल्ला जात नाही. कडीपत्ता पचनशक्ती सुधारतो, पित्तशामक आहे, आणि केस तसेच त्वचेसाठी उपयुक्त ठरतो.

कडीपत्त्याचे फायदे:

  1. पचन सुधारते: अपचन झाल्यास कडीपत्त्याचा काढा फायदेशीर ठरतो.
  2. पित्तशामक: पित्त कमी करण्यासाठी कडीपत्ता प्रभावी आहे.
  3. केसांसाठी फायदेशीर: केसांची वाढ होते आणि केस दाट होतात.
  4. त्वचेला तजेला: नियमित सेवनाने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

कडीपत्ता खाण्याचे मार्ग:

  1. चावून खाणे: भाजी किंवा आमटीतला कडीपत्ता बाहेर काढून टाकण्याऐवजी चावून खाल्ल्यास अधिक फायदा होतो.
  2. काढा तयार करणे: साजूक तूप, सुंठ, आणि कडीपत्ता उकळून काढा तयार करून प्यावा.
  3. पावडर स्वरूपात: कडीपत्त्याची पावडर करून ती थेट भाजीत किंवा आमटीत घालावी, त्यामुळे तो वाया जाणार नाही.

टीप:

कडीपत्त्याचा स्वाद आवडत नसेल, तर त्याचा काढा किंवा पावडर स्वरूपात वापरणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म सहज पचनात जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!