चोपडा रोडवर शिक्षकाला लुटले! चोरट्यांनी मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लंपास

आबिद शेख/अमळनेर
चोपडा रोडवरील नानागीर गोसावी यांच्या शेताजवळ एका शिक्षकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पातोंडा ते पारोळा अप-डाऊन करणाऱ्या या शिक्षकाला संध्याकाळच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अडवले.
गाडी आडवी करून त्याच्या नाकावर जोरदार बुक्का मारण्यात आला. त्यानंतर मकाच्या शेतात नेऊन चाकूच्या धाकाने त्याचे पाकीट हिसकावून घेतले, ज्यात रोख ₹2000 व मोबाईल होता. चोरट्यांनी त्याच्या अंगावरील कपडे फाडून मोटरसायकलची चावी दूर फेकली आणि घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.