आरटीई’ प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज …

‘
पालकांसाठी सूचना…..
24 प्राईम न्यूज 2मार्च 2023.पुणे, ता. २८ शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे अनलाइन अर्ज भरण्याची सुविधा बुधवारी (ता. १) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. कोरोनाकाळात पालक गमाविलेल्या बालकांनाही यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना “https:// student.maharashtra.gov.
in या संकेतस्थळावर अर्ज भरता
येणार आहे. तसेच शिक्षण विभागाने
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी
■ दिलेल्या मुदतीत एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा
● अर्ज करताना अचूक आणि खरी माहिती द्यावी
■ आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू नयेत
आवश्यक कागदपत्रे……
■ निवासी पुरावा : रेशन कार्ड, वाहन परवाना, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आदी
■ जन्म तारखेचा पुरावा : जन्मदाखला, पालकानी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन
■ सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा/बालकांचा जातीचा दाखला
■ आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला ■ दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कोरोनाकाळात म्हणजे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च
२०२२ या कालावधीत एक किंवा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना यंदा या प्रक्रियेतगत प्रवेश दिला जाणार आहे.
१७ मार्चपर्यंत मुदत
या प्रवेशप्रक्रियेत वंचित गटातील बालकांच्या प्रवेशासाठी वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. तर वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. या प्रक्रियेत पालकांनी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने | १७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर सोडत काढण्यात येईल. त्यात निवड झालेल्यांची नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविणार असल्याची माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
1