थकवा दूर करण्यासाठी हे सात मार्ग…

24 प्राईम न्यूज 11 Aug 2023
1 ) सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चीडचीड होते तसेच जास्त झोपण्याने शरीरात आळस निर्माण होतो.
2 ) पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.
3 )शॉवरखाली आंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे. जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रित
असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम
आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते.
4) म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
5) व्यायामामुळे रक्तात अँड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
6) शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.
7) थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पाहा दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.