मानदुखीवर वेळीच कॅरा उपाय..

24 प्राईम न्यूज 21 Jul 2023
ऑफिस किंवा घरात लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये तासंतास डोके खुपसून काम केल्यानंतर पाठीबरोबरच मानही दुखू लागते. दिवसभर आपण कामात असल्याने हे दुखणे तेव्हा तितके जाणवत नाही, मात्र सकाळी उठल्यानंतर मान भयंकर दुखायला लागते. मान जड झाल्यासारखी वाटते. काहींना मानेच्या दुखण्यामुळे चक्कर येते, पण त्यासाठी प्रत्येकवेळी आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही. कारण घरातही त्यावर उपचार होऊ शकतात. यामुळे मानदुखीचा त्रास होत असल्यास काय करावे ते बघूया.
-मान दुखत असेल, तर आईस पॅकचा वापर करू शकता. दुखऱ्या भागावर आईस पॅक ठेवल्याने वेदना कमी होतात.
पण जर आईस पॅक नसेल, तर थंड पाण्यात
-रुमाल बुडवून त्याने मानेला शेक द्यावा. मानेच्या स्नायूंना आराम मिळतो. याव्यतिरिक्त हिट पॅकचा वापर करू शकता, मात्र
-जर मान खूपच दुखत असेल, तर स्वतःहून कोणत्याही गोळ्या घेऊ नका. हलक्या हाताने मसाज करा. जेणेकरून मानेच्या
-येथे आराम मिळेल. मसाज करण्यासाठी तुम्ही राईचे तेल किंवा नारळाचे तेल वापरू शकता. याव्यतिरिक्त तिळाचे तेलसुद्धा वापरू शकता.
-रात्री झोपतेवेळी उशी घेणे टाळा. कारण चुकीच्या पद्धतीने झोपल्यानेही मानेच्या नसांवर दाब पडून त्या दुखू शकतात.
जर मानेचे दुखणे अधिक वाढले असेल, तर डॉक्टरांना भेटा.